Share

वाहन चोरीचे सत्र थांबेना, चार दुचाकी लंपास

Published On: 

औरंंगाबाद : शहरातील विविध भागातून चोरांनी चार दुचाकी लंपास केल्या आहेत. कोरोनाच्या संसर्ग काळातही वाहनचोरीचे सत्र थांबत नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. शहरभर पोलिसांची नाकाबंदी सुरू असतांना देखील वाहनचोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुचाकी वाहने हातोहात लंपास करीत आहेत.

अनिरुध्द शिवाजीराव दाभाडे (वय ३२, रा. बदनापूर, जि. जालना) हे व्यापारी आहेत. त्यांनी २५ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आकाशवाणी परिसरातील अपनाबाजार कॉम्पलेक्ससमोर दुचाकी (एमएच-२१-एएच-७८५७)उभी केली होती. चोराने अवघ्या दीड तासात त्यांची दुचाकी लांबवली.

शेख जलील अब्दुल रहेमान (वय ५७, रा. बुढीलेन) यांनी २२ एप्रिल रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास जामा मशिदीजवळ दुचाकी (एमएच-२०-सीक्यू-७०५३) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोरने हँडल लॉक तोडून लांबवली. तर महावीर उत्तमचंद साकला (वय ६१, रा. गोमटेश मार्केट, दलालवाडी) हे बसैय्येनगरातील पुतण्याकडे मुक्कामासाठी गेले होते. त्यांनी राधाकृष्ण अपार्टमेंटसमोर २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-बीएम-९६२१) उभी केली होती.

चोराने त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लंपास केली. तसेच वाळुज एमआयडीसी परिसरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या अजिंठा वाईन शॉपसमोर अमोल तेजराव सरोदे (वय ३२) याने १९ मार्च रोजी दुचाकी (एमएच-२०-डीएल-९७४२) उभी केली होती. ते दुकानातून परत येईपर्यंत चोराने त्यांची दुचाकी लांबवली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!