पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार केलीय.
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय. अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा असतो. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/NcpRupaliChakankar/videos/611886186847892/
हिमालयापुढे सह्याद्री कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही. अजित पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. जनताच आता भाजपला प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं


