🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या पाच महिन्यांपासून राज्याच्या अनेक भागांत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतीचे आणि मच्छिमारांचे यामध्ये सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका भाज्यांच्या उत्पादनावर झाला असून यामुळे भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
तसेच एरव्ही चाळीस रुपये किलोच्या भावाने मिळणारी वांगी, भेंडी, घेवडा, गवार आणि कोबी शंभरीच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरचा भाव दिडशे रुपयांच्या घरात आहे. तसेच तीस चाळीस रुपये किलोनं मिळणारी भाजी शंभरीपार गेली आहे.
अवकाळी पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले. भाजी विक्रेत्यांकडे एक शेवग्याची शेंग तब्बल २५ रुपयांना विकली जातेय. मटार दीडशे ते दोनशे रुपये किलोच्या घरात विकला जातोय. एरव्ही पाच ते दहा रुपयांना विकली जाणारी पालकची जुडी ऐंशी रुपयांच्या भावाने विकली जात आहे.
दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे भाव सातत्याने वाढताना दिसत असल्यामुळे महिलावर्ग भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने चांगलाच त्रस्त झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195603230933172225?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195604040341544961?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
