🕒 1 min read
अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. मात्र, हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यातून केंद्र सरकार आणि भाजपपुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते.
दरम्यान, आज सकाळी भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले होते. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले होते. याअगोदरही पाच ते सहा वेळा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.
महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर अण्णांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. मात्र तरीही अण्णांनी उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले
- …तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

