Share

निलेश इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे, काही मदत लागली तर कळव – शरद पवार

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.

अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत,’ असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले होते. यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला होता. तर, या लाटेत देखील त्यांनी आणखी एक कोविड सेंटर उभारलं असून या सेंटर्सच्या कारभारावर लंके स्वतः लक्ष ठेवून आहेत.

आता निलेश लंकेच्या कार्याचं कौतुक केलं जात असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लंकेना फोन करून कौतुकाची थाप दिली आहे. यासोबतच स्वतःची देखील काळजी घे, असं देखील त्यांनी लंकेना सांगितलं आहे. ‘तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळालं, तू इतरांची काळजी घेतोय मात्र स्वतःची पण काळजी घे. तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास कळव,’ असं शरद पवार यांनी लंकेना फोनकरून सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!