🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यासह औरंगाबाद जिल्हयात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या संसर्गाला हद्दपार करण्याची ताकद कोरोना प्रतिबंधक लसीकरणातून शक्य आहे. लसीकरण हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.
मी जबाबदार या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाला नियंत्रीत करण्यासाठी जिल्हयात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजना खाली जनजागृती संवाद दौरा सुरू आहे. जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन covid-19 प्रतिबंधक लसीकरण करणे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी जबाबदार ही मोहिम राज्यात सुरु केली आहे. त्याच धर्तीवर जिल्हयात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
आज खुलताबाद तालुक्यातील वेरूळ पळसवाडी गल्लेबोरगाव निरगुडी धामणगाव खिर्डी या गावांना भेटी देऊन लसीकरण केलेल्या नागरिकांनी व इतरही नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्री अवलंब करण्याचे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी या वेळी केले. विनाकारण कोणिही घराच्या बाहेर पडू नये. आरोग्याला जर काही त्रास जाणवला तर नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जावून तपासणी करुन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘अब्दूल सत्तारांवर आता कारवाई करणार का?’, खा.जलील यांचा सवाल
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- गंभीर कोरोनाबाधितांसाठी मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन
- राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट
- व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं, शिवेंद्रराजे कडाडले


