मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी.बी.आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल देशमुख यांनी राजीनामा दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे. देशमुखांकडील गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यासही त्यांनी मंजूरी दिली आहे.
दरम्यान,गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला गेले असून ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची शक्यता असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान,देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक आणखी आक्रमक झाले आहे. भाजपने टीकेची झोड उठवली आहे तर सरकारच्या मंत्र्यांना या घटनेमुळे उत्तरे देता देता नाकी नऊ आले आहे. यातच आता जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता असल्याने जयश्री पाटलांनी कॅव्हेट दाखल केली.
कॅव्हेट दाखल केल्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रकरणात पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. ज्यामुळे दोन्हींकडील बाजू ऐकूनच निकाल दिला जातो. सिव्हिल प्रोसिजर कोड 148 अ च्या अंतर्गत कॅव्हेट फाईल केलं जातं.
महत्त्वाच्या बातम्या :
- रोहित शेट्टीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे
- ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत नागरिकांनाच शिरावे लागेल’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

