Share

गंभीर कोरोनाबाधितांसाठी मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन

Published On: 

औरंगाबाद : वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता गंभीर बाधित रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेने आता दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी केली आहे. शासनाच्या कोट्यातून मायलान कंपनीकडून सवलतीच्या दरात ६५० रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे ही खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी दिली.

शहरात कोरोना रूग्णांचे प्रमाण अजूनही वाढतच असून मागील अवघ्या तीन दिवसात शंभर जणांचा मृत्यु झाला आहे. यातच बाधित रुग्ण मोठया प्रमाणावर गंभीर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मेल्ट्रॉनमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग होत असला तरी हे इंजेक्शन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. रेमडेसीवर इंजेक्शन बाहेरुन मागवावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पालिकेने हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात माहिती देताना डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या डीएमएआरकडून पालिकेसह जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना सरकारी कोटयामधून सवलतीच्या दरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी संदर्भात पत्राव्दारे कळवले होते. हे पत्र पालिकेला प्राप्त होताच तातडीने पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यांनी कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याची सूचना केली. त्यानुसार मायलान कंपनीकडे मागणी नोंदविण्यात आली. कंपनीकडून दहा हजार इंजेक्शनचा साठा प्राप्त झाला असून त्यातील दोन हजार इंजेक्शन बाधित रुग्णांना दिले आहेत. सवलतीच्या दरातदरात ६५० रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे हा दहा हजार इंजेक्शनचा साठा मिळाला असल्याचे डॉ. राठोडकर यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!