Share

कर्णपुरा, दुर्गा माता मंदिरात लसीकरणोत्सव; पहिल्या दिवशी १६७ भाविकांनी घेतली लस!

Published On: 

औरंगाबाद : शहरात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे या उद्दिष्टाने महानगरपालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता शहरातील चारही देवीच्या मंदिरात लसीकरणासोबतच कोरोना तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवारपासून (दि.११) कर्णपुरा, दुर्गा माता मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये देवीच्या उत्सवाबरोबरच लसीकरणाच्याही महाउत्सवास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी या दोन्ही मंदिरात १६७ भाविकांचे लसीकरण करण्यात आले. येत्या काळात आणखी दोन मंदिरांची यात भर पडणार आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

शहरातील कर्णपुरा माता मंदिर, हरसिद्धी माता मंदिर, रेणुकामाता, दुर्गामाता मंदिर या भाविकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी आता लसीकरण राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासोबतच २१ खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्रे सुरू झाल्याने शहरात एकूण ६६ लसीकरण केंद्रे झाली आहेत. कवच कुंडल मोहिमेत रोज १५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेच्या ४० आरोग्य केंद्रात व शहरातील २१ खाजगी रुग्णालयात कर्णपुरा दुर्गा मंदिर अशा एकूण ६९ ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस  देण्यात येत आहे.

मिशन कवच कुंडल मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत लस घ्यावी व ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन प्रशासकांनी केले आहे. मिशन कवच कुंडल मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आणखीन खाजगी रुग्णालयाचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी शिबिरे घेण्याचे नियोजन केले जात आहे. घंटागाडीवर मिशन कवच कुंडलची ध्वनिफित लावण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून या मोहिमेत शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच धर्मगुरूंनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!