नाशिक : नांदगाव शहरात उभारण्यात आलेल्या चुकीच्या सबवेमुळे रविवारी एका तीस वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे रेल्वे लाईन क्रॉस करत असताना महाराष्ट्र एक्सप्रेसचा धक्का लागून स्वाती शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच नांदगाव सबवेमध्ये साठलेल्या पाण्यात बुडता बुडता एक रेल्वे कर्मचाऱ्याचा थोडक्यात जीव बचावला होता आणि आज अखेर या सबवेने एका महिलेचा जीव घेतला. रविवारी सकाळी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या स्वाती शिंदे यांनी आपल्या तीन लहान मुलींना रुळा पलीकडे नेऊन पोहोचवलं मात्र या गडबडीत त्या स्वतः ला महाराष्ट्र एक्सप्रेस पासून वाचण्यात अपयशी ठरली.
नवरात्री उत्सवात एकविरा देवीच्या दर्शनासाठी स्वाती शिंदे पहाटेच्या वेळी आपल्या तीन लहान मुलींनसह निघाल्या होत्या. आणि रेल्वे लाईन ओलांडताना एक्सप्रेसच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगजीपणामुळे तीन लहान मुलींना आपल्या आईला डोळ्यांसोमोर मारताना पाहावं लागलं, हृदय पिळवटणारऱ्या या घटनेनंतर परिसरात मात्र दुःखाचं वातावरण आहे.
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून सबवे प्रश्न तातडीने मार्गी लावावा या करता आंदोलन, बैठका, घेण्यात आल्या होत्या आणि आज अखेर ही घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या नांदगावकर यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


