Share

‘योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल’; राज बब्बरांचे शाहरुखला समर्थन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रगच्या प्रकरणात अडकल्याचं दिसत आहे. शनिवारी संध्याकाळी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला ज्यामध्ये आर्यन खानही सहभागी होता. याप्रकरणी शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे.  त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही शाहरुख खान आणि आर्यन खानला पाठिंबा दिला आहे.

राज बब्बर यांनी ट्विट करत लिहिले की, “तो आला लढला आणि त्याने विजय मिळवला. शाहरुखला बऱ्याच काळापासून ओळखत आहे, त्याच्या आत्म्याला या कठीण काळात थोडाही धक्का बसणार नाही. जसे जग त्याच्या लहान मुलाला त्या जखमांद्वारे शिकवते, मला खात्री आहे की योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल. आशीर्वाद,” असे म्हणत राज यांनी शाहरुखला आधार दिला आहे. . यामध्ये शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.

आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचं सेवन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला त्यानंतर सापळा रचून एनसीबीने या क्रूझवर प्रवेश केला. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अचानक छापे घालत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले व क्रूझवरील तरुणांना ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!