Share

१८ वर्षांवरील सर्वांनाच कोवीड लस द्या : काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशींची मागणी

Published On: 

पुणे : शहरातील कोवीडची साथ नियंत्रणात आणण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांनाच कोवीड लसीकरण करणे गरजेचे असून, सरकारने या वयोमर्यादेला मान्यता द्यावी, अशी मागणी माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

देशातील सर्वाधिक कोवीडग्रस्त शहर अशी पुण्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे शहरातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात यावी. केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने त्यादृष्टीने विनाविलंब परवानगी द्यावी. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मध्ये लस निर्मिती केली जाते, त्यांच्याकडे लसीचा साठा पुरेसा आहे.

त्याचा वापरही पुणेकरांसाठी व्हावा. या लसीकरणासाठी मोठी आरोग्य यंत्रणा उभी करावी लागेल आणि त्याकरिता काँग्रेस पक्ष सहकार्य करेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पुण्यातील डॉक्टर्स, नर्सेस हे ही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अद्यापपर्यंत ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील मधुमेह, रक्तदाब असा त्रास असणाऱ्यांना ही लस देण्यात आली. त्यात शहर आणि जिल्ह्यात मिळून अडीच ते पावणेतीन लाख नागरिकांनी लस घेतली.

मात्र लसीकरणाचा हा वेग कमी आहे. आता सरसकट ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी पुणे शहर त्यात अपवाद करुन येथे लसीकरणाची वयोमर्यादा १८ वर्षे करावी. शहरात कोवीड साथीचा उद्रेक झाला आसल्याने वयोमर्यादा वाढवावी, असे पत्रकात नमूद केले आहे.

गेल्या वर्षभरात कोवीड साथीचा फटका बसल्याने शहरातील रोजगार निर्मिती थांबली आहे, व्यापार मंदावला आहे, शैक्षणिक संस्थांचे कामकाज विस्कळित झाले आहे. अशावेळी निर्माण झालेली दुसरी वाटही शहरांच्या अर्थकारणाला फार मोठा फटका देणारी ठरेल. याकरिता लसीकरण वाढविण्यासाठीचे निर्णय सरकारने त्वरित घ्यावेत असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!