नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार ते घरीच क्वॉरन्टाईन झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. काही लक्षणांमुळे शनिवारी कोरोना चाचणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं आणि गरजेनुसार कोरोना चाचणी करावी अशी मी विनंती करतो, असं स्वतंत्र देव यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची COVID-19 चाचणी देखील काल पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.
दरम्यान, काल एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली होती. महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली. त्यांना कालच घरी देखील सोडण्यात आले आहे. यानंतर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे. याबद्दल त्यांचे पुत्र आणि अभिनेते अभिषेख बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना या आजारावर मात केली असून त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.डाॕ.निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हाॕस्पीटलमध्ये उपचार चालू होते.
त्यांचे वय ९१ वर्ष असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी काळजी व्यक्त होत होती.डाॕ.निलंगेकर यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी देवाला अभिषेक करुन साकडे घातले.त्याचबरोबर ते आजारावर मात करावे यासाठी सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.आपल्या लाडक्या नेत्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह यावा यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन!
संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा
राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…
अविनाश, काळजी करू नको मै हू ना !, राज ठाकरेंचा खास निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

