Share

स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही भागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतो, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून प्रश्न विचारले आहे कि, ‘महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?’, असा प्रश्न देशपांडेंनी ट्वीटरच्या माध्यमातून महविकास आघडी सरकारला विचारला आहे.

तर पुढे ते म्हणाले कि, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी पॅटर्न’चं कौतुक करायचं आणि रुग्ण संख्या वाढल्यावर लोकांना बेजबाबदार म्हणायचं, अशा शब्दांत मनसेकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला.

सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवायचं काम करत आहे. लोकांनी कामं करायची नाहीत का?, असा प्रश्न मनसेनं सरकारला विचारला आहे. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!