🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल ( १५ मार्च ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे.
यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब हे यांनी देखील देखील वर्षावर दाखल होत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.
तर दुसऱ्या बाजूला शिवसेना अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही अल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांना जो न्याय लावण्यात आला तोच अनिल देशमुख यांना लावण्यात यावा. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
मात्र मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली त्या बैठकीत अनिल देशमुख यांचे समर्थन करण्यात करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्र्यांचे काम अतिशय उत्तम आहे त्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचे जाहीर करून वाझे पर्कारणार अनिल देशमुखांना सेफ केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची विकेट पडणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली तर नवी मुंबई पोलीस आयुक्त कोण असणार याबाबतही अंदाज लावले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम यांची नावं चर्चेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
- दहावी-बारावीच्या विद्यार्थांना वेबसाइटवर मिळणार सराव प्रश्नसंच शिक्षण मंत्र्यांची माहिती
- ‘ती’ स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंनी खोटी तक्रार कुणाच्या इशाऱ्यावर केली ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
