मुंबई : दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड हे सध्या चर्चेत आहे. द्रविडची एक सध्या जाहिरात खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्यांची हि जाहिरात आवडत आहे. या जाहिरातीमध्ये राहुल द्रविड त्याच्या स्वभावाच्या विरोधात दिसला आहे. शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले द्रविड जाहिरातीतील कारमधून बॅट फिरवत म्हणतो, ‘मी इंद्रानगरचा गुंडा आहे’.
जाहिरातीच्या हिटनंतर पोलिसांनी त्यातील काही भाग वापरुन लोकांना सावध केले आहे. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी लोकांना सतर्क करण्यासाठी द्रविडचा व्हिडिओ वापरला आहे.
Be it in "indiranagar" or anywhere.
Keep your calm,
Avoid unnecessary honking.#NagpurPolice pic.twitter.com/CTcfEV6AL8— Nagpur City Police (@NagpurPolice) April 10, 2021
मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केले असून यात मास्कचे महत्त्व स्पष्ट केले आहे. मुंबईशिवाय नागपूर पोलिसांनीही ही जाहिरात वापरात लोकांना सतर्क केले आहे. अशाप्रकारे पोलिसांनी लोकांना सावध केले. या व्हिडीओ मध्ये राहुल ट्ट्रॅफिकमध्ये अडकला असून आक्रमक होऊन सारखा हॉर्न वाजवत आहे. या व्हिडिओचा गुजरात आणि सुरतच्या पोलिसांनी वापर करून अशा प्रकारे आक्रमक होऊ नये असा देखील संदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेंकटेश प्रसादच्या उत्तराने पाकिस्तानी ट्रोलरची बोलती बंद
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत


