अंतरराष्ट्रीय : भारताची लोकसंख्या आणि रुग्णालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्स यांची संख्या यामध्ये बरीचशी तफावत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर्सची कमी जाणवत आहे. यासाठी आता अमेरिकेने भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्याचा पुढाकार घेतला आहे. तर याची अधिकृत माहिती अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I am proud to announce that the United States will donate ventilators to our friends in India. We stand with India and Narendra Modi during this pandemic. We’re also cooperating on vaccine development. Together we will beat the invisible enemy: US President Donald Trump #COVID19 pic.twitter.com/nNSWLKxPBJ
— ANI (@ANI) May 15, 2020
दरम्यान अमेरिकेचा चीनवरील रोष हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवरील राग सतत बोलून दाखवत आहेत. चीनने व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच जगाला या संदर्भात माहिती न दिल्याने दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे, असे डोनाल्ड ट्राम्प वारंवार बोलत आहेत. यावर आता नवीन माहिती समोर आली आहे.
अमेरिका भारताची मदत घेऊन चीनला धडा शिकवणार आहे. यासाठी अमेरिकेने 18 कलमी कार्यक्रमही आखला आहे. याबाबत एका वरिष्ठ अमेरिकन सीनेटरने माहिती दिली. सीनेटर थॉम टिलिस म्हणाले की, चीनने कोरोना व्हायरस पसरवला आहे, ज्याद्वारे लाखो अमेरिकन ग्रस्त झाले. अमेरिकन लोकांच्या आरोग्याची रक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या नुकसान भरपाईसाठी चीनवर निर्बंध लावण्यात यावेत.
महत्त्वाच्या बातम्या
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा ; १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर
#Corona : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

