Share

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा ; १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि त्याची दोन टप्प्यांती माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आज सीतारामन यांनी अन्न प्रक्रिया उद्द्योगांसाठी, शेती, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसायाबाबत पॅकेज जाहीर केले. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

इतर महत्त्वाच्या घोषणा : 

औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत

पशुपालन आणि दुग्ध व्यवसायसाठी १५ हजार कोटींची तरतूद

पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी १३ हजार ३४३ कोटींची तरतूद

मत्स्य व्यवसायासाठी २० हजार कोटींची तरतूद

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद

मधमाशी पालन व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद

भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी

लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

आज ११ घोषणा करण्यात आल्या ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळालं याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस आहे.

‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा’

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर

कोरोनाच्या संकटातून गरिबांना सावरण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!