🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया देत यामागे नक्की काय आहे? भाजपचे सलीम-जावेद कोण आहेत? ही स्क्रिप्ट कोणी लिहिलीये? त्यातले पात्र कोण आहेत. आणि डायरेक्ट कोणी केले आहे. याच्या खोलात आम्ही जाऊ आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येऊ. असा थेट इशारा भाजपला दिला आहे.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र पोलीस खोट्या कारवाया राजकीय दबावाखाली करत नाहीत. ज्यांनी आमचे फोन TAP केलेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आणि जर पोलिसांना कुभांड रचायचेच असेल तर त्यांना आम्हाला ईडीकडे, केंद्रीय यंत्रणांकडे पाठवावे लागेल. असा खोचक टोला लगावत विरोधी नेत्यांचे कामच असते आरोप करणे, सणसणाटी निर्माण करणे. कालही अशीच सणसणाटी निर्माण करण्यात आली. यामागे नक्की काय आहे भाजपचे सलीम-जावेद कोण आहेत? ही स्क्रिप्ट कोणी लिहिलीये? त्यातले पात्र कोण आहेत. आणि डायरेक्ट कोणी केले आहे. याच्या खोलात आम्ही जाऊ आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येऊ .”असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
फडणवीसांनी केलेले आरोप काय?
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. ते म्हणाले की,”राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय विरोधकांची कत्तल करण्याचं कट कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. आणि याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कटही करण्यात आला.”
नेमके प्रकरण काय?
जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.
दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून व्हिडिओ सत्यता पडताळून कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात ते सभागृहात उत्तर देणार आहेत. त्यामुळे नेमके आजच्या सभेत गृहमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “व्हिडिओ सत्यता पडताळून कारवाई करणार”, फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्यात झाला भरती
- “या” भागात पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा!
- MCC ने जाहीर केली नवीन नियमांची यादी; मोठे बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार
- “साहेब गाडी चालवत विधान भवनात आले अन्…”, सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
