जालना : अंबड चौफुली येथील मैदानात अनेक आजी माजी मंत्र्यांची उपस्थितीत ओबीसी समाजाचा विशाल मोर्च्या काढण्यात आला होता . दरम्यान या मोर्च्यात ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असा आशय असणारे फलक झळकताना दिसत असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वच समाजाचे प्रश्न सुटत असताना ओबीसी समाजाला जाणूनबुजून दुर्लक्षित केलं जात असल्याने या मोर्च्यावेळी ओबीसी समाजामध्ये एक असंतोषचा वातावरण निर्माण झालेले पाहायला यावेळी मिळत होत. संपूर्ण ओबीसी समाज येक्जीतीने एकत्रित आल्यामुळे सध्या ओबीसी समाजाची ताकद वाढलेली पाहायला मिळत होती
महाविकास आघाडीमध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार , धनंजय मुंडे यांसारखे ओबीसी समाजाचे मंत्री आहेत. यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री व्होवा अशा भावना समाजा मध्ये असल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झालेले पाहायला मिळत होत.यामुळे आता ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये आगामी काळामध्ये मुख्यमंत्री पदासाठी आशा पल्लवित होतात का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या ओबीसी मोर्चामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाज बांधवांनी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या मोर्चाने वेधले. दरम्यान विविध घोषांनानी जालना शहर दुमदुमन निघाले होते.
महत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!: अतुल लोंढे
- औरंगाबाद मनपा निवडणूक टप्प्यात, शहर भाजपकडून ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
- समाजातील वचिंत आणि दिव्यांगांना डावलून विकास होऊ शकत नाही : अशोक चव्हाण
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’


