औरंगाबाद : आपण एक स्त्री आहोत, मुलगी आहोत याचा कमीपणा न बाळगता सक्षम होणे गरजेचे आहे. आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर, सहन करू नका. आपली शक्ती वाढवा, खंबीर व्हा. आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत. वेळप्रसंगी कायद्याची मदत घ्या. आईवडिलांनी सुद्धा योग्य ते संस्कार आपल्या मुलांवर केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मनीषा कायंदे यांनी केले. संभाजीनगर युवती सेनेच्या वतीने सक्षम ती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या.
अत्याचार पीडित युवतीना महिलांना सक्षम करण्यासाठी संभाजीनगर युवती सेना संभाजीनगर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज गोविंदभाई श्रॉफ सरस्वती भुवन महाविद्यालय याठिकाणी ‘सक्षम ती’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयीन युवती व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उद्घाटन आमदार मनीषा कायंदे आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते केले. या प्रसंगी युवती सेनेच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य शितल देवरुखकर ,दामिनी पथक प्रमुख पीएसआय स्नेहा करवाडे , युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ कॉलेज कक्ष अधिकारी ऋषिकेश जैस्वाल जिल्हा संघटक अंजली मांडवकर युवती सेना जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जैस्वाल यांची उपस्थिती होती.
यावेळी युवती सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शीतल देवरुखकर म्हणाल्या की, आपण समाजात वावरताना आपला आत्मविश्वास वाढवा , खंबीर व्हा, स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम व्हा असे आवाहन करत गरज पडल्यास युवती सेना तुमच्या हाकेला धावून येईल असेही त्यांनी सांगितले.
दामिनी पथक हेड स्नेहा करवाडे म्हणाल्या की, समाज घडवण्यासाठी स्त्रीचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आईने योग्य संस्कार आपल्या मुलींवर केले पाहिजे एक चांगले राष्ट्र, कुटुंब, समाज घडवणे हे फक्त स्त्री च करू शकते म्हणून आपल्या मुलांवर आपण काय संस्कार करतो, हे फार महत्त्वाचे आहे. मुलींनी पण ठरवले पाहिजे आपण कसे जगले पाहिजे. मनाने, शरीराने आपण सक्षम असलो ताकदवान असलो तर स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकतो कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता समाजात वावरले पाहिजे. स्वतःचे स्वरक्षण करायला शिकले पाहिजे. कायद्याने स्त्रीला भरपूर अधिकार दिले आहेत, परंतु त्याचा योग्य तो उपयोग करावा असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेने कायम सामाजिक कार्य करतअसताना सेवा आणि सुरक्षेला महत्त्व दिले आहे. वाईट गोष्टीकडे न वळता मुलांनी सध्या शिक्षणाकडे आपला कल वाढवण्याची गरज आहे. चांगले शिक्षण घ्या, मोठे व्हा, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी युवती सेनेने अशाप्रकारचे कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करत यापुढे औरंगाबाद पोलीस, सुप्रसिद्ध विधिज्ञ युवती सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक विभागात अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन ‘सक्षम ती’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सेनेच्या औरंगाबाद जिल्हा युवती अधिकारी डॉ. अश्विनी जैस्वाल यांनी केले आहे. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक उपजिल्हा युवती अधिकारी यशश्री बखरिया, युवती सेना जिल्हा समन्वयक निकिता बरथूने, विधानसभा युवती अधिकारी मोनिका वल्ले, शहर युवती अधिकारी निकिता ताठे, उपशहर अधिकारी सानिका देवराज, श्वेता टोंपे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पाटील यांनी केले, तर आभार पूनम पाटील यांनी मानले.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!: अतुल लोंढे
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
