मुंबई : ऍडलेडमध्ये झालेल्या लज्जास्पद पराभवाचा बदला भारताने मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रहाणेच्या या नेतृत्वासाठी त्याचं देशासह क्रीडा विश्वातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी रहाणेसह टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. “वेल डन अजिंक्य. तमाम महाराष्ट्रासह देशाला आपलास खूप अभिमान आहे. विजयासाठी टीम इंडियाचं अभिनंदन”, या आशयाचं ट्विट उर्मिलाने केलं आहे.
Well done @ajinkyarahane88
तमाम महाराष्ट्राला आणि पुर्ण देशाला आपला खुपखुप अभिमान आहे ????????????
Congratulations #TeamIndia #AUSvIND #BoxingDayTest— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
तसेच पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंनी रहाणेला ट्विटमध्ये मेंशन करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.
A Boxing Day Test win to Team India captained by the fine knock of @ajinkyarahane88 ! Heartiest congratulations Team India!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

