🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : या सरकारने सांगितले होते शिवस्मारक बनवू, आंबेडकर स्मारक बनवू या फक्त थापाच निघाल्या. भाजपा हा फसवणूक करणारा पक्ष आहे आणि त्यामुळे यांच्या हातात पुन्हा सरकार जाता कामा नये. असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर केला आहे. काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार यांची जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला चांगलच फटकारलं.
दरम्यान, या सरकारच्या काळात सर्रासपणे लोकांना देशद्रोही ठरवले जात आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी विरोधी पक्षात होते तेव्हा आमच्या विरोधात भाषण करायचे, मात्र त्यांना आम्ही कधी देशद्रोही ठरवले नाही. हे सरकार दबावतंत्राचा उपयोग करत विरोधकांची गळचेपी करत आहे. असा आरोप शरद पवारांनी केला.
तर, नागपुरात ५०% कारखाने बंद, यवतमाळ येथे ६०% कारखाने बंद.. महाराष्ट्रात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. आघाडी सरकारने उद्योगांची निर्मिती केली, तरूणांना रोजगार मिळाला, मात्र आज वेगळी परिस्थिती आहे. रोजगार मिळत नाही आणि कंपन्या बंद होत आहेत. असा घणाघात देखील पवारांनी केला.
दलित-मागासवर्गीय समाजाप्रमाणे महिलांना देखील आम्ही आरक्षण दिले. पोलीस भरतीत महिला आरक्षण दिले. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या परेडमध्ये आज महिला दिसतात याचे समाधान वाटतं. देशाच्या प्रगतीसाठी आम्ही फक्त थापा मारल्या नाहीत, तर कामे केली. हे सांगायला सुद्धा पवार विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182527087019610113?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182524315465474048?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
