Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, मनसेकडून नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले आहे. आघाडीला मात्र दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्र्याच्या त्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रोयोगाची गरज आहे’ अशा आशयाच ट्वीट केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधातील सगळे पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांचा भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न करणार असल्याच चित्र दिसत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राजू शेट्टी यांनी भेट घेतली आहे. तसेच काल ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आणि आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी राज ठाकरे भेटले आहेत. त्यामुळे मनसे वेगळी समीकरणे घेऊन येणाऱ्या निवडणुकीत उतरणार असल्याचे हे संकेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!