🕒 1 min read
मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या फॅशन (Fashion) एक्सपिरिमेंट मुळे चर्चेत असते. उर्फी नेहमी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने इंटरनेटवर खळबळ निर्माण करत असते. तिने तिच्या फॅशनवर आजपर्यंत अनेक एक्सपिरिमेंट केले आहेत. यामध्ये तिने मोबाईल, घड्याळ, दगड, ब्लेड, चमकी, बँडेज इत्यादी गोष्टी पासून ड्रेस तयार करून परिधान केलेले आहेत. त्याचबरोबर ती आपल्याला न्यूड, सेमी न्यूड, टॉपलेस अशा अनेक लुकमध्ये देखील दिसली आहे. सध्या उर्फीने तिच्या फॅशनवर असाच काहीतरी नवा एक्सपिरिमेंट केला आहे. काही दिवसांपूर्वीच उर्फीचा पारंपारिक लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. चाहत्यांकडून तिच्या त्या लुकला चांगली पसंती मिळाली होती. अशा परिस्थितीत उर्फीने एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उर्फी जावेद (Urfi Javed) चा नवा लुक
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. ती कशापासून कपडे बनवून परिधान करेल याचा आता अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्त झाले आहे. अशात उर्फीने तिचा नवीन फॅशन एक्सपिरिमेंट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये उर्फीने चक्क कपड्यांच्या जागी दोन वाईन ग्लास समोर ठेवलेले दिसत आहे. यामध्ये तिने केसांचा हाय बन केला आहे. आणि समोर दोन वाईन ग्लास ठेवले आहे. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
Urfi Javed | अशी कोणती ही फॅशन?, कपडे सोडून उर्फीने समोर ठेवले दोन ग्लासhttps://t.co/rSjfAce1eQ
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) November 23, 2022
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच ट्रोल होत असते. सध्या उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकरी अशाच काही कमेंट करत आहे. यामध्ये एक नेटकरी म्हणाला आहे की,”हिला अनफॉलो करा लवकरच कारण हिचा बावळट पणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.” तर दुसरा एक नेटकरी कमेंट करत म्हणाला आहे की,”ही मुलगी काही सुधारणार नाही.”
उर्फी जरी कोणत्या सिनेमात दिसत नसली, तरी बिग बॉसनंतर उर्फीचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. इंस्टाग्रामवर उर्फीचे 3.9M फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामद्वारे उर्फी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही तर…”; संजय राऊतांचं मोठं भाकीत
- Gajanan Kale | ‘केम छो’च्या नंतर ‘कईसन बा’चा प्रयोगासाठी छोटे पप्पू रवाना ; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- SBI Recruitment | भारतीय स्टेट बँक यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Deepali Sayyed | चर्चा तर होणारच! दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटात प्रवेशावेळी उद्धव ठाकरे लावणार हजेरी?
- Sanjay Raut | “मला ऐकू येणं कमी झालंय, १५ दिवस…”, संजय राऊतांनी सांगितल्या त्यांच्या तुरुंगातील यातना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

