Share

औरंगाबादेत युपीएससी परिक्षा सुरळीत; ५६.३२ टक्के विद्यार्थ्यांनी मारली दांडी!

Published On: 

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रांवर रविवारी सकाळी तसेच दुपारच्या सत्रात ४७ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. या परिक्षेसाठी १४ हजार ५०४ उमेदवारांपैकी ६३३५ विद्यार्थीच परीक्षेसाठी हजर होते. या परीक्षेसाठी तब्बल ५६.३२ टक्के विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथील आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्या मार्फत विविध पदासाठी हि परीक्षा घेण्यात आली होती. औरंगाबाद मध्ये ४६ उपकेंद्रावर दोन सत्रात परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी १४ हजार ५०४ उमेदवार औरंगाबाद येथील केंद्रावर परीक्षा देणार होते. प्रशासनातर्फे त्यासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र परीक्षेसाठी १४ हजार ५०४ उमेदवारांपैकी ६३३५ विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली तर तब्बल ८१६९ विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते. यामुळे उपस्थित असलेल्या विद्यार्थी ४३.६८ टक्के तर अनुपस्थित असलेले विद्यार्थी ५६.३२ टक्के इतके असल्याचे पाहायला मिळाले.

परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॅाईंट पेन, मुळ ओळखपत्र, सॅनिटायझर बॉटल व पारदर्शक पाणी बॉटल या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी नव्हती. तर परीक्षेदरम्यान कॉपीचा किंवा अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यवेक्षणाधिकारी निलेश गटणे यांनी दिली. या परीक्षेच्या कामासाठी १९८९ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!