बीड : अप्पर जिल्हाधिकारी एन आर शेळकेला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन मदतमाश जाहीर करुन दुसऱ्याच्या नावे केली होती. अशाच अनेक देवस्थानाच्या जमिनीही लाटल्याचा शेळकेवर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पुरवठा विभागात कार्यरत असताना लाच घेतल्याप्रकरणी शेळकेला निलंबीत करण्यात आले होते. आता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जमीन घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादेतून अटक केली आहे.
बीड जिल्ह्यातील चिंचपूर येथील वक्क बोर्डाची जमीन अप्पर जिल्हाधिकारी शेळके याने दुसऱ्याच्या नावे केली होती. याप्रकरणी शेळकेवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेळकेने सेवेत असताना पदाचा गैरवापर करत वक्फ आणि देवस्थानाच्या जमिनी दुसऱ्यांच्या नावे केल्या. या घोटाळ्यातील अनेक दस्ताऐवज शेळकेच्या सहीचे असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी शेळकेला बीड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना लाच घेताना अटक झाली होती. त्यात त्याला निलंबित करण्यात आले होते. आता जमीन घोटाळ्याप्रकरणातही त्याचा हस्तक्षेप असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जमीन घोटाळ्यात आतापर्यंत १५ आरोपी समोर आले असून आणखी एक उपजिल्हाधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमीन घोटाळ्यात आरोपींना अटक होत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पोलीस महासंचालकाकडे केली होती त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा
- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा!’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

