Share

दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या करंज्या

Published On: 

🕒 1 min read

दिवाळी मध्ये जे मुख्य फराळाचे पदार्थ केले जातात त्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी. करंजी वर्षातून एकदाच केली जाते. त्यामुळे ती चांगली होणे गरजेचे आहे. करंजी हा पदार्थ फार निगुतीने करावा लागतो या करता खास आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या पाहणार आहोत.

साहित्य:

:सारण
सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाउण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड

करंजी पिठ
पाउण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाउण कप दूध
तळण्यासाठी तेल

कृती:
१) गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात.
२) करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.

karanji-olya-naralachi-diwali.
file photo

३) १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
४) करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
५) करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. [माझ्याकडे कातण नव्हते म्हणून काट्याने (Fork) कडेवरती थोडे डिझाईन केले.]
६) करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
७) तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!