Share

२०१४ ला जिंकलेली एकही जागा सोडणार नाही : रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेनेनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी युतीत मुख्यमंत्रीपदावरून कुरघोडी पाहायला मिळत आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी २०१४ ला जिंकलेली एकही जागा सोडणार नाही अस विधान केले आहे. त्यामुळे विधानसभेला जागावाटपावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात ५०-५० फॉर्म्युला ठरलेला आहे. परंतु २०१४ ला भाजपाने जिंकलेल्या १२३ जागांपैकी एकही जागा भाजपा सोडणार नाही असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केले आहे. २०१४ ला भाजपने १२३ तर शिवसेनेनी ६३ जागा जिंकल्या होत्या. पुढे बोलताना दानवे यांनी ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडल्या जाणार नाहीत. ज्या जागांवर पराभव झाला त्याठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर कोणता पक्ष असेल त्या जागा समन्वयाने एकमेकांना सोडणार आहे असं स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावर हक्क दाखवत दोनही पक्ष मुख्यमंत्री आमच्याचं पक्षाचा होणार असं ठामपणे सांगत आहेत. तसेच भाजप-सेनेचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयलाही मुख्यमंत्री पदाची आशा आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!