Share

दमदार पावसाची कमाल; पहिल्यांदाच 49 दिवस उजनीचे दरवाजे खुले

Published On: 

दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील नद्या नाले व धरणे तुडुंब भरले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवणूक क्षमता असलेल्या धरणापैकी उजनी धरण आहे.यंदाच्या दमदार पावसामुळे मागील दहा वर्षाच्या इतिहासात उजनीने विक्रम केला आहे.

यंदाच्या दमदार पावसामुळे 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे ठेवावे लागले आहेत. 28 ऑगस्ट 2017 पासून ते (काही अपवाद वगळता) कालपर्यंत 23 ऑक्टोबर 2017 पर्यंत म्हणजेच 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे राहिले असून, यातून तब्बल 89.10 TMC पाणी सोडावे लागले आहे.

 

यंदाच्या पावसामुळे धरणातून जेवढे पाणी सोडावे लागले आहे, त्या पाण्यात उजनी धरण दीड पट भरले असते.या अगोदर 2006-07 साली झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला होता, त्यावेळीही धरणातून तब्बल 300 TMC पाणी सोडावे लागले होते. त्यावेळीही 67 दिवस दरवाजे उघडे ठेवावे लागले होते.

उजनीच्या इतिहासात सर्वात निचांकी पातळी ही 2017-2015 ला झाली होती. त्यावेळी उजनीत वजा (मायनस) 53.74 % टक्के पाणी शिल्लक राहिले होते. सर्वात कमी म्हणजे निचांकी पातळी यावेळी उजनी धरणाची झाली होती.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!