Share

‘भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय’,

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी मुंडन करून भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीच्या विरोधात निदर्शनेहि करण्यात आली.

३० आॅक्टोबरला राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली . त्यामुळे ३० तारखेपासून ८ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे . ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष होत आहे. सरकारच्या या निर्णयाचे अपयश ठळकपणे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात येत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीनेसुद्धा पिंडदान करून श्राद्ध घालण्यात आले़ नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच मुंडणही करण्यात आले.मृत्यूनंतर ज्या गणपती घाटावर पिंडदानाचा विधी उरकला जातो त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणीच सोलापूर राष्ट्रवादीने आंदोलन करून सरकारच्या कामगिरीचा निषेध नोंदविला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!