Share

कानगावहून राज्यव्यापी शेतकरी संपास सुरुवात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – दौंड तालुक्यातील कानगावमधून शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला काल सुरुवात झाली आहे. कानगाव येथील मंदिरात शेतकरी, आणि महिलांनी दुधाने ग्रामदेवतेला अभिषेक घालून संपाला सुरुवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीसाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथून राज्यव्यापी संपाला सुरूवात झाली होती. या संपाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता कानगावमधील लोकंही आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारत आहे. शेतकऱ्यांचा दर्जा सुधारावा या आणि अशा अनेक मागण्या कानगावच्या शेतकऱ्यांच्या आहेत. संपूर्ण परिसरामध्ये चुलबंद ठेऊन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यात येतोय. यासाठी ठिकठिकाणी चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांनी संप सुरू केल्याने त्यांना दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी कानगाव येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना निवेदनही दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!