Share

दिवाळी स्पेशल- खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली

Published On: 

🕒 1 min read

दिवाळी आणि फराळ हे एक आगळ- वेगळ समीकरण आहे. गोड- तिखट पदार्थांच कॉम्बिनेशन म्हणजे फराळ. दिवाळीत मुखत्वे गोड पदार्थांमध्ये लाडू, करंजी असते.  तिखट पदार्थांमध्ये  चिवडा, चकली असते. चिवडा बनविण्यास सोपा सरळ साधा पदार्थ पण चकली मात्र किचकट पदार्थ अनेक महिला चकली किचकट असल्यामुळे शक्यतो बाहेरून रेडीमेट आणतात. किवां आजकाल बाजारपेठेत चकलीचे तयार पीठ देखील मिळते. पण आज आपण घरगुती व सोप्या पद्धतीने चकली कशी बनवता येते हे पाहणार आहोत.

भाजणी कशी बनवावी वाढणी : साधारण एक किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळी वेगवेगळया धुवून घ्याव्यात. वेगवेगळया सुती कपड्यावर सावलीत वाळत घालाव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी ब्राऊनिश रंग येईस्तोवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

टीपा:
१) चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
२) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.

भाजणीची चकली

भाजणी पासून चकली बनविणे

साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!