Share

आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो हा गर्व पोलींसाना झाला आहे, त्याला दाबला पाहिजे – अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेची घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलीसांवर अंकूश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल अजित पवारांनी केला.या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात. एवढ्या टोकाला पोलीस कसे पोहचू शकतात. आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो हा गर्व पोलींसाना झाला आहे, त्याला दाबला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

यापुढे 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवले होते. त्याबाबत विचारणा व्हायची. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.

आमचं मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!