Share

सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त श्वेताने शेअर केली भाविनक पोस्ट, म्हणाली…

Published On: 

मुंबई : बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज ३६वा वाढदिवस आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने (shweta singh kirti) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर सुशांतचे चाहत्यांनी लाईक कमेंट करत त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात त्याची जागा कायम आहे. त्याचा वाढदिवस आवर्जून साजरा करत त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने च्या व्हिडीओवर ‘आजही तुझी आठवण येते. वूई आर मिस यू सुशांत…’ अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

‘माय गॉड! हा किती सुंदर व्हिडिओ आहे. माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा… आम्ही तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सुशांतच्या टीमने हा सुंदर व्हिडीओ बनवला, तुमचे खूप खूप आभार.’ असं श्वेताने व्हिडीओवर कॅप्शन दिलं आहे.

सुशांतसाठी बनवलेला हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते खूप भावूक होत असून ‘सुशांत, आजही तुझी आठवण येते. आज तु असतास तर आणखी दर्जेदार सिनेमे बॉलीवूडला मिळाले असते.’ अशा कमेंट या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुशांत सिंग राजपूतचा १४ जून २०२० ला मृत्यू झाला. त्यावेळीही त्याचे चाहते भावूक झाले होते. आज त्याच्या वाढदिवशीही सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट (emotional video) पहायला मिळत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!