मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेल्वेतून उतरवण्यात आले.
विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या राजकीय नाट्यावर आता शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत बोलताना या सर्व प्रकरणातून शिवसेनेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोपी करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या या विधानावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. या संदर्भात तेच दोन पक्ष सांगू शकतात पण अस असेल तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून कारवाई थांबवायला हवी होती असे फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी ‘एनडीए’मध्ये यावे – रामदास आठवले
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?


