Share

शिवसेना खासदाराचा कौतुकास्पद उपक्रम ; निवडणुकीत जेवढी मतं मिळाली, तेवढी झाडं लावण्याचा संकल्प

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीत जेवढी मतं मिळाली, तेवढी झाडं लावण्याचा संकल्प उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलून दाखवला आहे. निंबाळकर पर्यावरणदिनी झाडे लावणार आहेत.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडकली, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विजय मिळवला. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी झाडं लावण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे.

पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरणूपरक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. मी उस्मानाबाद या दुष्काळी भागातील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. मला लोकसभा निवडणुकीत 5 लाख 91 हजार 705 मतांचे आशीर्वाद जनतेनं दिले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मी जितकी मते तितकी झाडे हा संकल्प राबवत आहे. त्यानुसार, मतदारसंघात 6 लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.

इतकेच नव्हे तर, लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे, त्यामुळे ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करणार आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, माझ्याप्रमाणे देशातील सर्वच नवनिर्वाचित खासदारांनी असा संकल्प केल्यास देशात पर्यावरणपूरक स्थिती निर्माण होऊन चांगले पर्जन्यमान होईल. असा सल्लाही त्यांनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!