Share

दिवंगत खा. मोहन डेलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

Published On: 

मुंबई – दिवंगत खासदार मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर, मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. कलाबेन यांना दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवारी देणार आहे अशी चर्चा आहे. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे.

डेलकर यांनी मरीन ड्रॉइव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळाली. डेलकर यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अभिनव डेलकर याने केलेल्या तक्रारीनुसार, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांनी मोहन डेलकर यांची छळवणूक केली होती. कारण त्यांना मोहन डेलकर यांना निवडणूक लढवण्यापासून अडवायचे होते. तसेच त्यांच्या महाविद्यालयाचा ताबा घेण्यापासून थांबवायचे होते.

दरम्यान, कठीण काळात शिवसेनेने कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या आत्महत्येची कडक चौकशी केली जाईल, असंही आश्वासन दिलं आहे. डेलकर हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्याशिवाय ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!