नवी दिल्ली – आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने संघटनात्मक काही नवीन नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्रातून पंकजा मुंडेंना यापूर्वीच राष्ट्रीय कार्याकारिणीत घेण्यात आले आहे. आता, चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे.
भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्य म्हणून नविन जबाबदारी दिल्याबद्दल @BJP4Maharashtra चे तसेच
विधीमंडळ नेते मा.@Dev_Fadnavis जी प्रदेशध्यक्ष @ChDadaPatil जी यांची मनापासून आभारी आहे
पक्षाने दिलेल्या जबाबदारीला पुर्ण न्याय देईन हा विश्वास देते ???????? @BJP4India pic.twitter.com/8k96R1NmYv— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 7, 2021
दरम्यान, भाजपने मोठी जबाबदारी दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्य म्हणून नविन जबाबदारी दिल्याबद्दल महाराष्ट्र भाजपा चे तसेच विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनापासून आभारी आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदारीला पुर्ण न्याय देईन हा विश्वास देते असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अटी शर्ती घालून विमा नाकारला तर, कंपनीला हद्दपार करू- संजय पाटील दुधगावकर
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

