धुळे : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात उद्यापासून राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. धुळेकर नागरिकांना आव्हान करताना सांगितले की, आपण स्वतः आपले व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, जेणे करून आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोना ची बाधा होणार नाही, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडाला मास लावणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, हात वारंवार सॅनिटायझ करणे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. किमान आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी हातभार लागेल. असे आव्हान यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1235355936805219/
महत्वाच्या बातम्या :
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- #IPL : डेक्कन चार्जर्स ते सनरायझर्स हैद्राबादचा एक विलक्षण प्रवास…..!
- पुण्यातील रुग्णालयांचे होम पॅकेज, पारनेरकरांच्या मुळावर!
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान – जितेंद्र आव्हाड
- शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारचं धोरण, सुलतानी निर्णयाविरोधात शेतकरी उतरला रस्त्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

