अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. होम पॅकेजच्या नावाखाली कोरोना बाधित रुग्णांना घरीच उपचार घेण्याचा पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांकडून दिला जाणारा सल्ला पारनेर तालुक्यात सामूहिक संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांकडून, कोरोनाची किरकोळ स्वरूपाची लक्षणे असतील, तर महागडी औषधे देण्यात येतात. या रुग्णांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो. होम पॅकेज या गोंडस नावाखाली रुग्णांकडून पाच ते दहा हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. त्यानंतर घरी जाऊन रुग्णाला त्रास वाढलाच, तर तो पुन्हा आपल्याच रुग्णालयात दाखल होईल, याची काळजी घेतली जाते. होम पॅकेज घेऊन घरी पाठविण्यात आलेले रुग्ण घरी विलगीकरणात राहून उपचार घेतच नाहीत. मला काहीच त्रास होत नाही असे म्हणत हे रुग्ण स्वतःच्या गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पारनेर तालुक्यातील अनेक कोरोना बाधित रुग्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जातात. परंतु तेथील रुग्णालयांकडून होम पॅकेज देऊन रुग्णांना घरी पाठविले जाते. बाधित रुग्ण घरी विलगीकरणात न राहता आजूबाजूला फिरून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास मदत करतो असे दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय महागार्ग बंदचा इशारा; मराठा समाज आक्रमक
सरकारची चूक दाखवल्यास जेलची हवा खावी लागेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे – बाळासाहेब थोरात
खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

