🕒 1 min read
नवी दिल्ली: यूपी विधानसभा निवडणुक मतदानाचा (UP Assembly Election 2022)आज पहिला टप्पा सुरु झाला आहे. आज यूपीतील ५८ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान युपी निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.
“देशाला भयापासून मुक्त करा, बाहेर या, मतदान करा”, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियमांचे पालन करून लोकशाहीच्या या पवित्र सणात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना गरीब वर्गातील मतदारांना घाबरवले जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने ट्विटद्वारे केला आहे. त्यामुळे मतदानाच्या पहिल्याच दिवशी यूपीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
देश को हर डर से आज़ाद करो-
बाहर आओ, वोट करो!— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 10, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव में आज पहले चरण की वोटिंग है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड नियमों का पालन करते हुए लोकतंत्र के इस पावन पर्व में बढ़-चढ़कर हिस्सा लें। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2022
दरम्यान मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये खराबी झाल्याचे समोर आले आहे. मथुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. बुथ क्रमांक ४४२ वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान थांबले आहे. तर मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार?’; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल
- ‘कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार?’; सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल
- “मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, कॉंग्रेसचा इशारा
- “…हेच का तुमचं महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र बाणा”, राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावले
- के एल राहुलचे अजब रन आऊट सोशल मीडियावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
