नवी दिल्ली: लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर मुद्दे मांडले. तसेच सध्या कर्नाटकात हिजाब प्रकरणावर जो वाद चिघळला आहे यावर देखील त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणते कपडे घालायचे ते हेच ठरवणार, काय खायचं हेच ठरवणार, कुठे जायचं, कधी जायचं हेच ठरवणार, काय बोलायचं, काय नाही बोलायचं हेच ठरवणार, काय शेयर करायचं काय फॉरवर्ड करायचं हेच ठरवणार, मग याला हुकुमशाही म्हणायची तर आणीबाणीचा राग हे आमच्यावर काढणार, यांच्यावर टीका केली तर राष्ट्रद्रोहाचा खटला टाकणार, लोकशाहीसाठी आंदोलन केलं तर आम्ही आंदोलनजीवी म्हणून आम्हाला हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार, असा खणखणीत सवाल केंद्र सरकारला केला आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक हिजाब प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बद्दल मला खूप आदर आहे, आम्ही दोघी स्त्रिया आहोत आणि आमच्या दोघींना पण मुली आहेत. तसेच कर्नाटक येथील भाजप आमदार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. महिलांच्या कंपड्यांमुळे बलात्कारचे प्रमाण वाढले आहे, असं वक्तव्यं भाजप आमदाराने केले होते यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध करत यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- के एल राहुलचे अजब रन आऊट सोशल मीडियावर व्हायरल
- शिवसेना आणि महाराष्ट्र येड्यागबाळ्यांसमोर झुकणारा नाही- संजय राऊत
- “मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, कॉंग्रेसचा इशारा
- “जर मी भारतात जन्मलो असतो तर…”; एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
- अमरावती शाईफेक प्रकरण; आयुक्त प्रवीण आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया


