🕒 1 min read
बार्शी: वैराग तालुका निर्मिती बरोबरच कायम निसर्गलहरीवर अवलंबून असलेल्या बार्शी तालुक्यात हरितक्रांती घडविणार्या बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी वैराग भागाला देण्यासाठी जीवाचे रान करू असे, सांगत बार्शी शहर व तालुक्यात आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी दिली आहे. सुर्डी गावभेट दौर्यानिमित्त ग्रामस्थांशी संवाद साधताना सोपल बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवा दिंडोरे, दीपक आंधळकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात नगरसेवक विलास रेणके, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, दगडू मांगडे, राहूल कोंढारे, नागजी नान्नजकर, सुर्डीचे माजी सरपंच दादा डोईफोडे, अड.विकास जाधव, विनोद वाघमारे, बाजीराव मोहिते उपस्थित होते.
पुढे सोपल म्हणाले, बार्शी शहर व तालुक्यात उद्योग निर्मितीच्या माध्यमातून बेरोजगारांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. बार्शी शहर व तालुक्यात लोकप्रतिनिधी या नात्याने शासनदरबारी वजन वापरून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे विरोधक नारळ फोडून, भूमीपूजन करून अकारण श्रेय लाटत आहे. विकास कामांच्या नावाखाली जनतेची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल विरोधकांकडून करण्यात येत असून वैराग भागातील जनतेला वैराग भागाचा विकास कोणी केला हे चांगलेच माहित आहे.
वैराग तालुका निर्मिती, वैराग व 57 गावांना उजनीचे पाणी देणे, वैरागला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे, वैराग भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अरोहरात्र प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी सोपल यांनी दिले. शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बांधील राहणार असून आपण जनताच उमेदवार असल्याच्या भावनेतून काम करा, असे आवाहन दिलीप सोपल यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183264716287700993?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183256491840561154?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
