Share

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल होणार बंद

Published On: 

मुंबई : महापरीक्षा पोर्टलमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे पोर्टल बंद करण्यात यावे, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच युवक- युवतींची एकमुखाने मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महाविकास आघाडीने हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दम्यान, महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेऊन महाराष्ट्रातील होतकरू युवक- युवतींचे होणारे प्रचंड नुकसान लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी करण्यात येत होती. ”महापरीक्षा पोर्टलला असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन सत्ता आल्यास ते बंद करण्याचे आश्वासन आघाडीने दिले होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. आता सरकारी नोकरभरती त्या- त्या विभागामार्फत होणार आहेत.

तसेच राज्यात 72 हजार पदांच्या महाभरतीला सुरवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीने घेतला आहे.

मागील( भाजप) राज्य सरकारकडूनकडून सरकारी पद भरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये फक्त आणि फक्त सावळा गोंधळ चालू आहे. यामध्ये, सामूहिक कॉपी, योग्य बैठक व्यवस्था नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवारांना पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न होणे अशा अनेक घटनांमुळे महापरीक्षा पोर्टलचा भ्रष्ट कारभार महाराष्ट्रासमोर आला होता. त्यामुळे हे पोर्टल तात्कळ बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!