Share

२०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्व खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात : प्रकाश जावडेकर

Published On: 

नवी दिल्ली : देशभरातली करोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराच्या वर गेली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. मात्र त्यानंतरही कोरोनाशी लढा सुरूच राहणार आहे. आपल्या देशावर आलेलं कोरोनाचं संकट हे खूप मोठं आहे. त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक पार पडली. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती दिली

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेतला असून या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे .करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” असाही त्यांनी यावेळी स्पष्ट केल.

त्याचबरोबर देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय झाला असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच लॉकडाउननंतर काय केलं जाणार? यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ” जगभरातल्या करोनाच्या फैलावाचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स आपण घेत आहोत. भारतात काय उपाय योजायचे हे त्या त्या वेळी ठरवलं जाईल. तूर्तास लॉकडाउननंतर काय निर्णय घ्यायचा याची चर्चा बैठकीत झाली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!