उस्मानाबाद : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी विविध सांप्रदायातील सांप्रदायिक नेतृत्व करणाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असून, कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन करून सर्व नियमांचे पालन करण्यास नागरिकांना भाग पाडणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद येथे आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात डॉ. फड बोलत होते. ते म्हणाले की, आजही मोठ्या प्रमाणावर लोकांचा विश्वास सांप्रदायिक नेतृत्व करणाऱ्या तसेच सांप्रदायाला, भाविक, भक्तांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांवर, कीर्तन, प्रवचनकारांवर, वारकऱ्यांवर विश्वास आहे. त्यामुळे समाजाला आध्यात्मिक, सामाजिक, दिशा देणाऱ्या या मान्यवरांनी कोरोनाच्या अशा कठीण परिस्थितीत लोकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे. अकारण व आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अशा प्रकारच्या आवाहनावर भर देण्याची गरज आहे.
आधी केले मग सांगितले या संतोक्तीप्रमाणे प्रत्येकजण वागू लागला तर कोरोनाची लागण कोणालाही होणार नाही, एकत्र येण्यामुळे व नियमाचे पालन न करण्यामुळे तसेच मला काही होत नाही, मुझे कुछ नही होता, अशा मनोवृत्तीमुळे कोरोना प्रसारास वाव मिळत आहे. आपल्यामध्ये कोरोनाला तोंड देण्याची क्षमता असली तरीही आपल्यामुळे ज्याला कोरोना होईल, त्यांच्यात आपल्यासारखी क्षमता असेलच असे नाही याचे भान, मला काही होत नाही, असे म्हणणाऱ्यांनी ठेवायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांप्रदायिक नेतृत्व करणाऱ्यांचा सकारात्मक पुढाकार कोरोनास प्रतिबंध करण्यास निश्चितच मदतीचा होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

