🕒 1 min read
जालना : साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या वतीने आज साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार होती. मात्र बारामतीला निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. राज्य सरकार आंदोलनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे थेट शरद पवार यांच्या कानावर हा विषय थेट घालण्यासाठी बारामतीत आंदोलकांची रॅली जाणार होती.
मात्र बारामतीला प्रस्थान करण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदेलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर बळजबरीने अटक करण्यात आली. यात मनोज जरांगे पाटील, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनिल औटे, दादासाहेब बोचरे यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन आम्हाला अटक करत आहात का? असा सवाल यावेळी आंदोलकांची उपस्थित केला.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येथील आंदोलनाला सरकार गांभिर्याने घेत नसल्याने मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढून बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्याकडेच हट्ट धरला जाणार असल्याचे साष्टपिंपळगाव आंदोलकांनी ठरवले होते. मात्र ही रॅली निघण्यापुर्वीच पोलिसांनी आंदोलकाना आटक करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
- दहावी-बारावीच्या विद्यार्थांना वेबसाइटवर मिळणार सराव प्रश्नसंच शिक्षण मंत्र्यांची माहिती
- ‘ती’ स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंनी खोटी तक्रार कुणाच्या इशाऱ्यावर केली ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
