Share

धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट

Published On: 

परळी  : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट दिले असून पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी बाबत अधिकृतरित्या शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे.

या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० सहित पुढील तीन वर्षांसाठी पीकविमा संरक्षण देण्यात आले आल्याने 3 वर्षांसाठी प्रश्न एकदाच मुंडे यांनी सोडवला आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० साठी कोणतीही पिकविमा कम्पनी निविदा प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यास तयार नव्हती, अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न करून ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी लिमिटेड यांना जिल्ह्याचा पीकविमा स्वीकारण्यासाठी अक्षरशः भाग पाडले आहे.

मागील वर्षी भाजपा सरकारच्या काळात रब्बी हंगाम २०१९मध्ये बीड जिल्ह्यात कोणत्याही पीक विमा कंपनी ने निविदा प्रक्रियेत सहभागी न झाल्याने केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना हक्काच्या विम्यापासून वंचित राहावे लागले.

परंतु यावर्षी कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पिक विम्यापासून वंचित राहावे लागणार नाही असा शब्द जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. बीड जिल्ह्याला पिक विमा कंपनी मिळवून द्यायची यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला कोणतीही कंपनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा घेण्यास तयार नसेल तर राज्य शासनाने याचा भाग उचलावा अशी भूमिका त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातत्याने मांडली त्यानंतर राज्याच्या कृषी विभाग धनंजय मुंडे यांनी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी यांच्याशी संपर्क करून या कंपनीत बीड जिल्ह्याची जबाबदारी सोपवली.त्यानुसार आता शासकीय आदेश जारी करत धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

या शासकीय आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी विमा संरक्षण देणार असून ही कम्पनी पुढील तीन वर्षांसाठी करारबद्ध असणार आहे. तसेच कम्पनी नियमात अधिकचा भार झाल्यास तो राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे अशी माहिती मुंडे यांनी दिली .

धनंजय मुंडे यांचा आज 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र यावर्षी करोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याची भूमिका घेऊन त्यांनी जनतेला घरातच बसण्याचे आवाहन केले होते, आपल्यासाठी हेच वाढदिवसाचे गिफ्ट आहे असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मात्र पिक विमा कंपनीचे रिटर्न गिफ्ट दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ काँग्रेस नेत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

बारामतीतही आता पुन्हा वाढवला लॉकडाऊन

अमित देशमुखांचा धडाका ; कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घेतला मोठा निर्णय

खोटे खुलासे करून नागपूरकरांची दिशाभूल करु नका; महापौरांची मुंढेंवर घणाघाती टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!