Share

अमित देशमुखांचा धडाका ; कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : कोविड -१९ विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – अशोक चव्हाण

या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार असून कोविड -१९ नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार , उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करेल.

कराचीतील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात – इम्रान खान

जिल्ह्याधिकाऱ्याना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत काळविन्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!